Thursday, July 9, 2009

सनई-चौघडे

काल सनई-चौघडे बघितला. बंगळुरू मधे असल्यामुळे बघायचा राहिला होता.

चित्रपटाची नायिका सई, तिच्या प्रियकरच्या (अनौरस) मुलाला स्वीकारणार्या माणसाशीचं लग्न करणार असते. कांदेपोहे विवाह संस्थेच्या मालकाने राबवलेल्या अभिनव उपक्रमातून तिचं लग्न ठरतं. पण आयत्या वेळी ती होणार्या नवर्याला मुलाबद्दल सांगते आणि मग चित्रपट टिपिकल वळण घेतो.

ह्या सगळ्यात खटकलेली गोष्ट म्हणजे ज्या मुलासाठी ती इतका आकांडतांडव करते त्या मुलाची ना ती साधी फोनवर चौकशी करत नाही त्याला कधी भेटायला जात :( आपण अशी अनेक उदाहरणं बघितली आहेत की नवर्याच्या मृत्यूनंतर अनेक बायका (अगदी अशिक्षीतसुद्धा) मुलांना स्वबळावर वाढवतात. मात्र सई जी आजच्या काळातली तरुणी आहे,ती मुलाला नातेवाईकाकडे सोडते, मुलाला जगापासून लपवते आणि लग्न करायची वेळ आल्यावर होणार्या नवर्याने मुलासकट स्वीकारावं असा आग्रह धरते.