Friday, March 28, 2008

ह्यांना सुशिक्षित का म्हणावं ?

मागच्या आठवड्यात आमची टीम जेवायला एका हॉटेल मधे गेली होती. A/C हॉटेल. थोड्या वेळाने एका मुलाने आम्ही मुली बसलो होतो तिथे येऊन विचारल -
"Do you mind if I smoke here?"
मला क्षणभर त्याची कीव आली. A/C हॉटेल मधे smoke केलं तर इतरांना त्रास होणार इतकी साधी गोष्ट जर एखाद्याला कळत नसेल, तर त्याला Software Professional च काय पण सुशिक्षित तरी का म्हणावं असा मला प्रश्न पडला.
"No Smoking" असं office मधे जिथे जिथे लिहिलेल असेल तिथेच जाउन हे लोक smoke करणार. तुम्हाला नसेल आपल्या जीवाची पर्वा , पण इतरांना Passive Smoking चे शिकार का करता ? Office चे corridors , parking areas बघावं तिथे फुकणारे हजर. ह्या लोकांना कधी सुबुद्धी येणार हे तो ब्रह्मदेवही नाही सांगू शकणार !

Wednesday, March 26, 2008

इन्कलाब

इन्कलाब हे भगतसिंग ह्या महान क्रांतिकारकाच्या जीवनावर आधारित चरित्र आहे. आपल्या पिढीच्या प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं पुस्तकं.

वयाच्या २४ व्या वर्षी भगतसिंग शहीद झाले. हसत हसत देशासाठी प्राण जाणार म्हणून मोठ्या अभिमानाने मृत्यूला सामोरे गेले. मी जेव्हा विचार करते की २४ वर्षाची असताना अशी वेळ माझ्यावर आली असती तर मी इतक्या सहजपणे मृत्यूला सामोरी गेले असते का ? उत्तर ''हो, नक्कीच गेले असते" , असं पटकन नाही येतं. कदाचित स्वातंत्र्यपूर्व काळात जन्माला आले असते , तर वेगळा विचार झाला असता.

आत्ता देशातली परिस्थिती काय आहे ? प्रत्येक क्रिककेटपटूचा दिनक्रम, कोणी किती रन्स काढल्या , विकेट्स कुठे किती घेतल्या हे सगळा मुखोद्गत असलेल्या पिढीला आपल्या देशासाठी शहीद झालेल्यानविषयी किती माहिती आहे ? क्रिकेट मधे भारत जिंकला की जग जिंकल्याचा आनंद होतो , पण सीमेवर एखादा जवान शहीद झाला तर घरातली एखादी व्यक्ती नाही पण निदान ओळखीचा एखादा मित्र गेल्याचं दुःख किती जणांना होतं ? एक वेळचं जेवण मिळायला उशीर झाला तर आपला जीव कासावीस होतो , भगतसिंग आणि त्यांचे साथीदार ६३ दिवस उपाशी कसे राहीले असतील ? आणि ते सुद्धा दररोज इंग्रजांचा मार सहन करून.

भारताला स्वातंत्र्य मिळालं ते असे असंख्य द्यात - अद्यात हुतात्मे शहीद झाले म्हणून, नुसतं अहिंसा - सत्याग्रह करत बसलो असतो तर कदाचित अजून पर्यंत गुलामगिरितच असतो.

लिहायचा होतं पुस्तकाबद्दल , पण दुसरेच मुद्दे येत गेले. अप्रतिम पुस्तकं आहे, भगतसिंग ह्यांच्यावरील चित्रपट पहिले असतील, पण हे पुस्तक जरूर वाचा.

पुस्तकाचे नाव - इन्कलाब
लेखिका - मृणालिनी जोगळेकर

Friday, March 21, 2008

वाचक स्पर्धा

मधे पुण्यात मी एका स्पर्धेला गेले होते. वाचक स्पर्धा होती. मला वाटल विचारतील पुस्तक आणि लेखकांबद्दल काही प्रश्न.
प्रश्नपत्रिका बघितली आणि मी उडालेच, अस वाटल मराठी MA चा पेपर तर नाही ना समोर आणून ठेवलाय :P
रसग्रहण काय आणि स्पष्टीकरण काय असेच काय काय प्रश्न होते. सामान्य वाचक (जे विकत घेऊन किवा library मधे पुस्तक वाचतात ते काय असा अभ्यास करायला थोडेच वाचतात पुस्तकं). सामान्य वाचक पुस्तक वाचतो ते मनोरंजन, माहिती मिळवणे, एखाद्या विषयात आवड असणे ह्या कारणांसाठी.
जर तुम्हाला असेच प्रश्न ठेवायचे होते तर हौशी वाचक का साहित्याचा अभ्यास करणार्‍यांना च प्रवेश द्यायचा
तुम्हाला प्रश्न कसे वाटले ह्या खाली मी असे बरेच मुद्दे लिहिले होते, माहीत नाही ते परीक्षकांनी लक्षात घेतले आहेत की नाही. ह्या पुढे अशा स्पर्धांना जाताना कानाला खडा :D

Wednesday, March 19, 2008

शुभारंभ

नमस्कार ,

हा माझा पहिलाच ब्लॉग आहे.
कधी वाटला नव्हता की मी लिहीन.............. शाळेत असताना निबंध लिहायचा झाला की मला असा वैताग यायचा, कदाचित तिथे विषयाचा बंधन असेल म्हणून असेल

अशी अपेक्षा आहे की regularly काहीतरी लिहीन आणि कोणीतरी वाचेल :D

मला वाचायला फार आवडत, त्यामुळे पुस्तकांबद्दल लिहीन जास्त करून