Friday, March 21, 2008

वाचक स्पर्धा

मधे पुण्यात मी एका स्पर्धेला गेले होते. वाचक स्पर्धा होती. मला वाटल विचारतील पुस्तक आणि लेखकांबद्दल काही प्रश्न.
प्रश्नपत्रिका बघितली आणि मी उडालेच, अस वाटल मराठी MA चा पेपर तर नाही ना समोर आणून ठेवलाय :P
रसग्रहण काय आणि स्पष्टीकरण काय असेच काय काय प्रश्न होते. सामान्य वाचक (जे विकत घेऊन किवा library मधे पुस्तक वाचतात ते काय असा अभ्यास करायला थोडेच वाचतात पुस्तकं). सामान्य वाचक पुस्तक वाचतो ते मनोरंजन, माहिती मिळवणे, एखाद्या विषयात आवड असणे ह्या कारणांसाठी.
जर तुम्हाला असेच प्रश्न ठेवायचे होते तर हौशी वाचक का साहित्याचा अभ्यास करणार्‍यांना च प्रवेश द्यायचा
तुम्हाला प्रश्न कसे वाटले ह्या खाली मी असे बरेच मुद्दे लिहिले होते, माहीत नाही ते परीक्षकांनी लक्षात घेतले आहेत की नाही. ह्या पुढे अशा स्पर्धांना जाताना कानाला खडा :D

1 comment:

Silence said...

वाचक स्पर्धा... असा प्रकार पुण्यातच होत असावा.. पुर्वी कधी ऐकलं नाही. अजून सविस्तर लिहा...वाचायला आवडेल.