- मी सायूरी - अनुवाद - सुनंदा अमरपूरकर एका जपानी गेइशाच्या आत्मचरित्रचा अनुवाद. लेखिकेने अतिशय ओघवती आणि सहज सोपी भाषा वापरली आहे. गेइशान्चे एक वेगळेच जग आपल्यासमोर उलगडत जाते.
- ब्रेडविनर , परवाना , शौझिया - मूळ लेखिका - डेबोरा एलिस. अनुवाद - अपर्णा वेलणकर . तालिबानी राजवट आणि त्यानंतरही अफगाणिस्तान मधील परिस्थिति चे वर्णन वाचून अंगावर अक्ष्ररशः काटा उभा राहतो.
- मीना - अनुवाद - शोभा आणि दिलिप चित्रे. इराण मधील मीना नावच्या मुलीने केलेले बंड ह्यावर अतिशय वाचनीय असे हे पुस्तक. ह्या साईटला अवश्य भेट द्या -http://www.rawa.org/meena.html
- केतकरवहिनी - एका स्त्रीने लढवलेले खोतांविरुद्धचे खटले आणि कोकणातल्या अतिशय दुर्गम भागात एकटिने काढलेले दिवस ह्याचे वर्णन.
- हॅनाची सूट्केस - जपान मधील एका शाळेला एका मुलीची सूट्केस मिळते, पण त्या मुलीविषयी काहिच माहीती उपलब्ध होत नाही. त्या शाळेची संचालिका अखेर ती सूटकेस कोणाची आहे ह्याचा शोध लावते. ती सूटकेस असते हॅना नावाच्या एका मुलीची जिचा नाझीन्च्या छळछावणीत म्रुत्यु झालेला असतो. हॅनाने काढलेली चित्रे आणि तिचे तिच्या कुटु॑बासोबत फोटो पुस्तकात समविष्ट केले आहेत.
- ठसे माणसांचे - मीना नेरुरकर. लेखिकेला आलेले माणसांचे अनुभव ओघवत्या शैलीत दिलेले आहेत.
- अशी ही मुंबई - भारतकुमार राऊत. मुंबईच्या अनेक अपरिचित ठिकाणांशी लेखक आपला परिचय करुन देतो. प्रत्येक ठिकाणाचा फोटो दिला आहे.
- शहेनशहा - ना. सं. इनामदार. औरंगजेब बादशहाचे चरित्र. एकदा हातात घेतले कि पूर्ण झाल्याशिवाय पुस्तक ठेववत नाही.
- ही श्रींची इच्छा - श्रीनिवास ठाणेदार . श्रीनिवास ठाणेदार ह्यांचे आत्मचरित्र. बेळगाव ते अमेरीका हा त्या॑चा प्रवास थक्क करणारा आहे.
- काबुल ब्युटी स्कूल - मूळ लेखिका - डेबोरा रॉड्रिक्स. लेखिका अफगाणिस्तानला जाउन तिथल्या बायकांना Beauty School च्या माध्यमातून स्वःतच्या पायावर उभ राहण्यासाठी मदत करते.
- फॉर हियर, ऑर टू गो ? - अपर्णा वेलणकर. अमेरिकेला स्थायिक झालेल्या माणसांचे तिथले अनुभव , ह्यावर एक अभ्यासपूर्ण पुस्तक अपर्णा वेलणकर ह्यांनी लिहिले आहे.
- एन आर आय - भूषण देवधर. परदेशात उत्तम संधी उपलब्ध असताना भारतात परत आलेल्या काही Nest-Returned Indians चे अनुभव लेखकाने संकलित केले आहेत.
मला कल्पना आहे कि एक-दोन वाक्यात पुस्तक कशावर आहे किंवा खरोखरच वाचनीय आहे का ह्याचा अंदाज येत नाही. ही माझ्यातली त्रुटी आहे कि मी अनेक पुस्तक वाचते, पण त्यावर कोणी विचारल तर एक्-दोन वाक्या॑पलीकडे नाही सा॑गू शकत :( .
ह्या पैकी कोणतेही पुस्तक मिळाल, तर नक्की वाचा.................................
No comments:
Post a Comment