Wednesday, October 12, 2016

My Art and Craft

दिवाळी आकाश कंदील - 

१. हा मागच्या वर्षी केलेला - 




Thursday, July 9, 2009

सनई-चौघडे

काल सनई-चौघडे बघितला. बंगळुरू मधे असल्यामुळे बघायचा राहिला होता.

चित्रपटाची नायिका सई, तिच्या प्रियकरच्या (अनौरस) मुलाला स्वीकारणार्या माणसाशीचं लग्न करणार असते. कांदेपोहे विवाह संस्थेच्या मालकाने राबवलेल्या अभिनव उपक्रमातून तिचं लग्न ठरतं. पण आयत्या वेळी ती होणार्या नवर्याला मुलाबद्दल सांगते आणि मग चित्रपट टिपिकल वळण घेतो.

ह्या सगळ्यात खटकलेली गोष्ट म्हणजे ज्या मुलासाठी ती इतका आकांडतांडव करते त्या मुलाची ना ती साधी फोनवर चौकशी करत नाही त्याला कधी भेटायला जात :( आपण अशी अनेक उदाहरणं बघितली आहेत की नवर्याच्या मृत्यूनंतर अनेक बायका (अगदी अशिक्षीतसुद्धा) मुलांना स्वबळावर वाढवतात. मात्र सई जी आजच्या काळातली तरुणी आहे,ती मुलाला नातेवाईकाकडे सोडते, मुलाला जगापासून लपवते आणि लग्न करायची वेळ आल्यावर होणार्या नवर्याने मुलासकट स्वीकारावं असा आग्रह धरते.

Friday, September 5, 2008

सध्या वाचलेली काही पुस्तके -
  1. मी सायूरी - अनुवाद - सुनंदा अमरपूरकर एका जपानी गेइशाच्या आत्मचरित्रचा अनुवाद. लेखिकेने अतिशय ओघवती आणि सहज सोपी भाषा वापरली आहे. गेइशान्चे एक वेगळेच जग आपल्यासमोर उलगडत जाते.
  2. ब्रेडविनर , परवाना , शौझिया - मूळ लेखिका - डेबोरा एलिस. अनुवाद - अपर्णा वेलणकर . तालिबानी राजवट आणि त्यानंतरही अफगाणिस्तान मधील परिस्थिति चे वर्णन वाचून अंगावर अक्ष्ररशः काटा उभा राहतो.
  3. मीना - अनुवाद - शोभा आणि दिलिप चित्रे. इराण मधील मीना नावच्या मुलीने केलेले बंड ह्यावर अतिशय वाचनीय असे हे पुस्तक. ह्या साईटला अवश्य भेट द्या -http://www.rawa.org/meena.html
  4. केतकरवहिनी - एका स्त्रीने लढवलेले खोतांविरुद्धचे खटले आणि कोकणातल्या अतिशय दुर्गम भागात एकटिने काढलेले दिवस ह्याचे वर्णन.
  5. हॅनाची सूट्केस - जपान मधील एका शाळेला एका मुलीची सूट्केस मिळते, पण त्या मुलीविषयी काहिच माहीती उपलब्ध होत नाही. त्या शाळेची संचालिका अखेर ती सूटकेस कोणाची आहे ह्याचा शोध लावते. ती सूटकेस असते हॅना नावाच्या एका मुलीची जिचा नाझीन्च्या छळछावणीत म्रुत्यु झालेला असतो. हॅनाने काढलेली चित्रे आणि तिचे तिच्या कुटु॑बासोबत फोटो पुस्तकात समविष्ट केले आहेत.
  6. ठसे माणसांचे - मीना नेरुरकर. लेखिकेला आलेले माणसांचे अनुभव ओघवत्या शैलीत दिलेले आहेत.
  7. अशी ही मुंबई - भारतकुमार राऊत. मुंबईच्या अनेक अपरिचित ठिकाणांशी लेखक आपला परिचय करुन देतो. प्रत्येक ठिकाणाचा फोटो दिला आहे.
  8. शहेनशहा - ना. सं. इनामदार. औरंगजेब बादशहाचे चरित्र. एकदा हातात घेतले कि पूर्ण झाल्याशिवाय पुस्तक ठेववत नाही.
  9. ही श्रींची इच्छा - श्रीनिवास ठाणेदार . श्रीनिवास ठाणेदार ह्यांचे आत्मचरित्र. बेळगाव ते अमेरीका हा त्या॑चा प्रवास थक्क करणारा आहे.
  10. काबुल ब्युटी स्कूल - मूळ लेखिका - डेबोरा रॉड्रिक्स. लेखिका अफगाणिस्तानला जाउन तिथल्या बायकांना Beauty School च्या माध्यमातून स्वःतच्या पायावर उभ राहण्यासाठी मदत करते.
  11. फॉर हियर, ऑर टू गो ? - अपर्णा वेलणकर. अमेरिकेला स्थायिक झालेल्या माणसांचे तिथले अनुभव , ह्यावर एक अभ्यासपूर्ण पुस्तक अपर्णा वेलणकर ह्यांनी लिहिले आहे.
  12. एन आर आय - भूषण देवधर. परदेशात उत्तम संधी उपलब्ध असताना भारतात परत आलेल्या काही Nest-Returned Indians चे अनुभव लेखकाने संकलित केले आहेत.

मला कल्पना आहे कि एक-दोन वाक्यात पुस्तक कशावर आहे किंवा खरोखरच वाचनीय आहे का ह्याचा अंदाज येत नाही. ही माझ्यातली त्रुटी आहे कि मी अनेक पुस्तक वाचते, पण त्यावर कोणी विचारल तर एक्-दोन वाक्या॑पलीकडे नाही सा॑गू शकत :( .

ह्या पैकी कोणतेही पुस्तक मिळाल, तर नक्की वाचा.................................

Friday, March 28, 2008

ह्यांना सुशिक्षित का म्हणावं ?

मागच्या आठवड्यात आमची टीम जेवायला एका हॉटेल मधे गेली होती. A/C हॉटेल. थोड्या वेळाने एका मुलाने आम्ही मुली बसलो होतो तिथे येऊन विचारल -
"Do you mind if I smoke here?"
मला क्षणभर त्याची कीव आली. A/C हॉटेल मधे smoke केलं तर इतरांना त्रास होणार इतकी साधी गोष्ट जर एखाद्याला कळत नसेल, तर त्याला Software Professional च काय पण सुशिक्षित तरी का म्हणावं असा मला प्रश्न पडला.
"No Smoking" असं office मधे जिथे जिथे लिहिलेल असेल तिथेच जाउन हे लोक smoke करणार. तुम्हाला नसेल आपल्या जीवाची पर्वा , पण इतरांना Passive Smoking चे शिकार का करता ? Office चे corridors , parking areas बघावं तिथे फुकणारे हजर. ह्या लोकांना कधी सुबुद्धी येणार हे तो ब्रह्मदेवही नाही सांगू शकणार !

Wednesday, March 26, 2008

इन्कलाब

इन्कलाब हे भगतसिंग ह्या महान क्रांतिकारकाच्या जीवनावर आधारित चरित्र आहे. आपल्या पिढीच्या प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं पुस्तकं.

वयाच्या २४ व्या वर्षी भगतसिंग शहीद झाले. हसत हसत देशासाठी प्राण जाणार म्हणून मोठ्या अभिमानाने मृत्यूला सामोरे गेले. मी जेव्हा विचार करते की २४ वर्षाची असताना अशी वेळ माझ्यावर आली असती तर मी इतक्या सहजपणे मृत्यूला सामोरी गेले असते का ? उत्तर ''हो, नक्कीच गेले असते" , असं पटकन नाही येतं. कदाचित स्वातंत्र्यपूर्व काळात जन्माला आले असते , तर वेगळा विचार झाला असता.

आत्ता देशातली परिस्थिती काय आहे ? प्रत्येक क्रिककेटपटूचा दिनक्रम, कोणी किती रन्स काढल्या , विकेट्स कुठे किती घेतल्या हे सगळा मुखोद्गत असलेल्या पिढीला आपल्या देशासाठी शहीद झालेल्यानविषयी किती माहिती आहे ? क्रिकेट मधे भारत जिंकला की जग जिंकल्याचा आनंद होतो , पण सीमेवर एखादा जवान शहीद झाला तर घरातली एखादी व्यक्ती नाही पण निदान ओळखीचा एखादा मित्र गेल्याचं दुःख किती जणांना होतं ? एक वेळचं जेवण मिळायला उशीर झाला तर आपला जीव कासावीस होतो , भगतसिंग आणि त्यांचे साथीदार ६३ दिवस उपाशी कसे राहीले असतील ? आणि ते सुद्धा दररोज इंग्रजांचा मार सहन करून.

भारताला स्वातंत्र्य मिळालं ते असे असंख्य द्यात - अद्यात हुतात्मे शहीद झाले म्हणून, नुसतं अहिंसा - सत्याग्रह करत बसलो असतो तर कदाचित अजून पर्यंत गुलामगिरितच असतो.

लिहायचा होतं पुस्तकाबद्दल , पण दुसरेच मुद्दे येत गेले. अप्रतिम पुस्तकं आहे, भगतसिंग ह्यांच्यावरील चित्रपट पहिले असतील, पण हे पुस्तक जरूर वाचा.

पुस्तकाचे नाव - इन्कलाब
लेखिका - मृणालिनी जोगळेकर

Friday, March 21, 2008

वाचक स्पर्धा

मधे पुण्यात मी एका स्पर्धेला गेले होते. वाचक स्पर्धा होती. मला वाटल विचारतील पुस्तक आणि लेखकांबद्दल काही प्रश्न.
प्रश्नपत्रिका बघितली आणि मी उडालेच, अस वाटल मराठी MA चा पेपर तर नाही ना समोर आणून ठेवलाय :P
रसग्रहण काय आणि स्पष्टीकरण काय असेच काय काय प्रश्न होते. सामान्य वाचक (जे विकत घेऊन किवा library मधे पुस्तक वाचतात ते काय असा अभ्यास करायला थोडेच वाचतात पुस्तकं). सामान्य वाचक पुस्तक वाचतो ते मनोरंजन, माहिती मिळवणे, एखाद्या विषयात आवड असणे ह्या कारणांसाठी.
जर तुम्हाला असेच प्रश्न ठेवायचे होते तर हौशी वाचक का साहित्याचा अभ्यास करणार्‍यांना च प्रवेश द्यायचा
तुम्हाला प्रश्न कसे वाटले ह्या खाली मी असे बरेच मुद्दे लिहिले होते, माहीत नाही ते परीक्षकांनी लक्षात घेतले आहेत की नाही. ह्या पुढे अशा स्पर्धांना जाताना कानाला खडा :D

Wednesday, March 19, 2008

शुभारंभ

नमस्कार ,

हा माझा पहिलाच ब्लॉग आहे.
कधी वाटला नव्हता की मी लिहीन.............. शाळेत असताना निबंध लिहायचा झाला की मला असा वैताग यायचा, कदाचित तिथे विषयाचा बंधन असेल म्हणून असेल

अशी अपेक्षा आहे की regularly काहीतरी लिहीन आणि कोणीतरी वाचेल :D

मला वाचायला फार आवडत, त्यामुळे पुस्तकांबद्दल लिहीन जास्त करून