Wednesday, March 26, 2008

इन्कलाब

इन्कलाब हे भगतसिंग ह्या महान क्रांतिकारकाच्या जीवनावर आधारित चरित्र आहे. आपल्या पिढीच्या प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं पुस्तकं.

वयाच्या २४ व्या वर्षी भगतसिंग शहीद झाले. हसत हसत देशासाठी प्राण जाणार म्हणून मोठ्या अभिमानाने मृत्यूला सामोरे गेले. मी जेव्हा विचार करते की २४ वर्षाची असताना अशी वेळ माझ्यावर आली असती तर मी इतक्या सहजपणे मृत्यूला सामोरी गेले असते का ? उत्तर ''हो, नक्कीच गेले असते" , असं पटकन नाही येतं. कदाचित स्वातंत्र्यपूर्व काळात जन्माला आले असते , तर वेगळा विचार झाला असता.

आत्ता देशातली परिस्थिती काय आहे ? प्रत्येक क्रिककेटपटूचा दिनक्रम, कोणी किती रन्स काढल्या , विकेट्स कुठे किती घेतल्या हे सगळा मुखोद्गत असलेल्या पिढीला आपल्या देशासाठी शहीद झालेल्यानविषयी किती माहिती आहे ? क्रिकेट मधे भारत जिंकला की जग जिंकल्याचा आनंद होतो , पण सीमेवर एखादा जवान शहीद झाला तर घरातली एखादी व्यक्ती नाही पण निदान ओळखीचा एखादा मित्र गेल्याचं दुःख किती जणांना होतं ? एक वेळचं जेवण मिळायला उशीर झाला तर आपला जीव कासावीस होतो , भगतसिंग आणि त्यांचे साथीदार ६३ दिवस उपाशी कसे राहीले असतील ? आणि ते सुद्धा दररोज इंग्रजांचा मार सहन करून.

भारताला स्वातंत्र्य मिळालं ते असे असंख्य द्यात - अद्यात हुतात्मे शहीद झाले म्हणून, नुसतं अहिंसा - सत्याग्रह करत बसलो असतो तर कदाचित अजून पर्यंत गुलामगिरितच असतो.

लिहायचा होतं पुस्तकाबद्दल , पण दुसरेच मुद्दे येत गेले. अप्रतिम पुस्तकं आहे, भगतसिंग ह्यांच्यावरील चित्रपट पहिले असतील, पण हे पुस्तक जरूर वाचा.

पुस्तकाचे नाव - इन्कलाब
लेखिका - मृणालिनी जोगळेकर

5 comments:

मोरपीस said...

खरच, आपल्या क्रिककेटपटूंना काहीतरी समज दिली पाहिजे

Jaswandi said...

he pustak milavanyacha nakki prayatn karen...
blog mast ahe.. ajun pustakanbaddal lihit raha...:)

Rajesh said...

लेख चांगला आहे.... आजकालच्या ह्या धकाधकीच्या जीवनात फार कमी लोका राहिलीयेत जी वेळ काढतात आणि आपली मते लोकांसमोर मांडतात .......ह्यासाठी पहिले तुझे अभिनंदन करतो...असेच पुढे लिहीत जा आणि मग आम्ही सुद्धा थोडा वेळ काढून काहीतरी लिहीत जाऊ
आपण समाजात काहीतरी बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.....आता सुरवात करायची झाली तर उद्यापासूनच आपण त्याला सुरुवात करू शकतो. उद्या "Earth Hour, run by WWF, the conservation organisation, is a global climate change initiative which calls on individuals and businesses around the world, to turn off their lights for one hour on Saturday March 29 2008 between 8 pm and 9pm. Do visit the website: http://www.earthhourus.org/"
यापासून सुरूवात केळेळली नक्कीच चांगली.

Sneha said...

blog chaan aahe pahilyandach baghitala... atanehami vachen...
ajun pustaka.nbadal mahiti vachayala avadel

Unknown said...

i like u r blogs
and i also wish to best of luch