Friday, March 28, 2008

ह्यांना सुशिक्षित का म्हणावं ?

मागच्या आठवड्यात आमची टीम जेवायला एका हॉटेल मधे गेली होती. A/C हॉटेल. थोड्या वेळाने एका मुलाने आम्ही मुली बसलो होतो तिथे येऊन विचारल -
"Do you mind if I smoke here?"
मला क्षणभर त्याची कीव आली. A/C हॉटेल मधे smoke केलं तर इतरांना त्रास होणार इतकी साधी गोष्ट जर एखाद्याला कळत नसेल, तर त्याला Software Professional च काय पण सुशिक्षित तरी का म्हणावं असा मला प्रश्न पडला.
"No Smoking" असं office मधे जिथे जिथे लिहिलेल असेल तिथेच जाउन हे लोक smoke करणार. तुम्हाला नसेल आपल्या जीवाची पर्वा , पण इतरांना Passive Smoking चे शिकार का करता ? Office चे corridors , parking areas बघावं तिथे फुकणारे हजर. ह्या लोकांना कधी सुबुद्धी येणार हे तो ब्रह्मदेवही नाही सांगू शकणार !

5 comments:

मोरपीस said...

ह्या लोकांना सुबुध्दीचा ’स’ देखील माहित नसेल

Bhitri Bhagu said...

हे लोक सुशिक्षित आहेत पण सुसंस्क्रुत नाहि. हा खुप मोठा फरक आहे सुशिक्षित आणि सुसंस्क्रुतपणा मध्ये.

वैदिक विद्यालय Vedic Vidyalay said...

कल मैं न्यूयार्क मे वर्ल्ड ट्रेड सेन्टर से निकला, वहाँ आजकल बहुत भीड होती हैं क्योकि निर्माण चालू है । उस भीड में भी लोग सिगरेट पी रहे थे?

Jaswandi said...

kharach ga, khup jast Dokyat jato ha prakar!!

Mohan Lele said...

सुशिक्षित एवढ्यासाठीच म्हणायचं, कारण आपण जी चूक करतोय त्याचा दूस-याला त्रास होईल ह्याची जाणिव त्याला झाली.
सुशिक्षीत आणि सुजाण ह्यातील अंतर दूर करण्याची शक्ती फक्त संस्कारात आहे